कोरोंना विशेष

कोव्हिड लसीकरणासाठी लहान मुलाच्या बारामतीत चाचण्या

12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चाचण्या सुरु असून बारामती हॉस्पिटलमध्येही 100 ते 150 मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत.

कोव्हिड लसीकरणासाठी लहान मुलाच्या बारामतीत चाचण्या

12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चाचण्या सुरु असून बारामती हॉस्पिटलमध्येही 100 ते 150 मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत.

28 दिवसांच्या कालमर्यादेत या मुलांना तीन डोस देऊन त्यांच्यामध्ये काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

बारामती वार्तापत्र

किशोरवयीन मुलांसाठी लसीकरणाच्या दृष्टीने आता देशभरात चाचण्या सुरु झाल्या आहेत. बारामतीतही अशा चाचण्या होणार असून त्यानंतर या मुलांना लसीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चाचण्या सुरु असून बारामती हॉस्पिटलमध्येही 100 ते 150 मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. 28 दिवसांच्या कालमर्यादेत या मुलांना तीन डोस देऊन त्यांच्यामध्ये काय परिणाम होतात याचा अभ्यास केला जाणार आहे.

परिणामांचा करणार अभ्यास –

लसीकरण करण्यापूर्वी या मुलांच्या आरटीपीसीआर तपासणी तसेच त्यांच्यातील अँटी बॉडीजच्या तपासण्याही केल्या जाणार आहेत. बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या प्रक्रियेमध्ये प्रिन्सिपल इनव्हेस्टीगेटर म्हणून कार्यरत असतील. एका कंपनीच्या लसीची ही चाचणी होणार असून मुलांमध्ये लस देण्यापूर्वी व नंतरचे बदल यांचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. भारतात अजूनही लहान मुलांसाठी कोणत्याच कंपनीच्या लसीला संपूर्ण मान्यता मिळालेली नाही आहे. यापार्श्वभूमीवर विविध कंपन्यांकडून लसीच्या चाचण्या वेगाने सुरु आहेत. बारामतीत तिस-या टप्प्यातील लसीची चाचणी केली जाणार आहे. अठरा वर्षांवरील सर्वांना लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असला तरी संभाव्य तिसरी लाट व लहान मुलांना होणारा धोका विचारात घेता लहान मुलांच्या लसींची शक्य तितक्या लवकर तयारी गरजेची असून त्या दृष्टीने ही बाब महत्वाची ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!