
कोव्हिड सेंटर्स अंधारात…
कोरोनाच्या भितीत अंधाराचा थरथराट.
बारामती वार्तापत्र
गेल्या काही तासांपासून बारामतीत मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे काही वेळा करिता बारामती शहरातील वीज पुरवठा खंडित केला होता.मात्र काही वेळानंतर बारामतीत शहरातील वीज पुरवठा पूर्ववत झाला असला तरी मात्र बारामतीतील काही कोविड सेंटर ही अद्याप देखील अंधारातच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
लाखो रुपये खर्च करून बारामतीत कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले होते.मात्र आज पावसामुळे खंडित झालेल्या वीज पुरवठ्यामुळे या कोविड सेंटर मध्ये आज जनरेटर ची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.त्यामुळे आधीच कोरोनाच्या संकटाचा सामना करत असणाऱ्या रुगणांची आता लाईट ने देखील साथ सोडल्यामुळे त्यांना आता दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.