कोरोंना विशेष

क्वारंटाईन सोल्जर स्पर्धा

सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे उदास व निष्क्रियतेची भावना समाजात रुजू पाहात आहे. एक प्रकारच्या नकारात्मकतेची; तसेच शारीरिक व बौद्धिक मरगळ येऊ पाहात आहे, त्यामुळे यातून सकारात्मक विचारमंथन घडावे, अबालवृद्धांना लिहिते करून मिळालेल्या वेळेचा सृजनात्मक उपयोग करण्याच्या दृष्टीने‌ जागरूक नागरिक मंचाद्वारे या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाइन निबंध स्पर्धेतील विजेत्याला ‘क्वारंटाईन सोल्जर’ अशी उपाधी व ट्रॉफी; तसेच अन्य विजेत्यांना अकराशे, एकवीसशे व अन्य रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. भूक ही फक्त शारीरिक नसते तर बौद्धीक व हृदयाचीही असल्याने तिला गंज चढू नये म्हणून आपल्या विचारांना कागदावर उतरवण्याचा आनंद निबंध लेखनातून देण्याचे व घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्पर्धेचे गट व विषय

गट क्र. १ : (वय ८ ते १२) विषय : ‘लॉकडाउनमध्ये मजा येतेय की सजा?’ किंवा ‘घरात बसून कसे वाटते आहे?’.

गट क्र. २ : (वय १३ ते २५) विषय : ‘लॉकडाउनमधला माझा प्रामाणिक दिनक्रम’ किंवा ‘मला लॉकडाउनमध्ये स्क्रीनचे व्यसन जडले का?’

गट क्र. ३ : (फक्त महिलांसाठी राखीव गट) विषय : ‘एक महिला म्हणून ‘लॉकडाउनमध्ये माझी भूमिका’ किंवा ‘लॉकडाउनमुळे मला जाणवलेला कौटुंबिक बदल.’

गट क्र.४ : (सर्व प्रौढ स्त्री-पुरुष नागरिकांसाठी- खुला गट) विषय :’थांबलेलं जग कसं वाटतंय?’ किंवा ‘लॉकडाउनचे माझ्यावर खरेच काय मानसिक परिणाम होतील?’

गट क्र. ५ : (फक्त पत्रकारांसाठी व मीडिया रिपोर्टरसाठी राखीव गट) विषय :’लॉकडाउन संपल्यावरचे जग कसे असेल?’ किंवा ‘लॉकडाउन ही मानव इतिहासातली उत्क्रांती ठरेल काय?’

गट क्र.६ (अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी राखीव) विषय : ‘लॉकडाउन- मी, माझी कर्तव्ये व माझे कुटुंब’ किंवा ‘लॉकडाउनमध्ये मला दिसलेली समाजाची मानसिकता’.

निबंध स्पर्धेचे नियम

निबंध फक्त ५०० शब्दांचे (सुमारे ६०-७० ओळी) असावेत व गुगल व्हॉइस टायपिंग ज्यांना जमते, त्यांनी तसे टायपिंग करून पाठवावेत किंवा टायपिंग केलेली सॉफ्ट कॉपी (युनिकोडमध्ये) किंवा मग कागदावर चांगल्या अक्षरांमध्ये लिहून पाठवावेत. त्यावर निवडलेला निबंध विषय, पूर्ण नाव, वयोगट क्रमांक, पत्ता, मोबाइल क्रमांक लिहून; तसेच त्याचा वाचता येईल असा फोटो काढून ९८२३७२२२१२ या नंबरवर व्हॉटस अॅप करावा. किंवा suhasbhai.sm @ gmail. यावर १४ एप्रिल २०२०पर्यंतच ई-मेल करावेत. स्पर्धेतील निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे लॉकडाउनची स्थिती पाहून समारंभात वितरित केली जातील. उत्कृष्ट निबंध पुस्तक रुपाने प्रसिद्धही केले जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!