खडकवासला धरणातून गेल्या दोन दिवसांत दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला

आतादेखील धरणातून 7 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे.

खडकवासला धरणातून गेल्या दोन दिवसांत दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला

आतादेखील धरणातून 7 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे.

पुणे: बारामती वार्तापत्र

गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मागील तीन दिवसात खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमधील पाणीसाठ्यात 11.5 टीएमसी इतकी वाढ झाली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 20.21 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.

खडकवासला धरणातून गेल्या दोन दिवसांत दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आतादेखील धरणातून 7 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सध्या खडकवासला धरण 82 टक्के भरले आहे.

पवना धरण 71 टक्के भरले

पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली. सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी 24 जुलैला तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.

कुकडी धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात दोन दिवसांत 4.2 टीएमसीची वाढ

गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्नर तालुक्यातील कुकडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात 4.2 टीएमसीची वाढ झाली आहे. कुकडी प्रकल्प अंतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणाच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात ही वाढ झाली आहे.

सध्या वडज धरणातून सध्या मिना नदीत 523 इतका क्युकेस वेगाने विसर्ग सुरू आहे. तर पिंपळगाव जागा धरणातुन मृत साठा काढल्याने या धरणात 100 दश लक्ष घनफूट पाणीसाठ्यात वाढ होऊन या धरणात एकुण वजा 798.द.ल.घनफूट (-20.52%) इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!