कोरोंना विशेष

कोणतीही वैद्यकीय माहिती नसताना मंगल लॅबोरेटरीला बदनाम करण्याचा प्रयत्न डाॅ.पंकज गांधी.

शनिवार दि.५ रोजी पासुन सुरु झाली आहे बारामतीतील सांस्कृतिक केंद्र (वसंतराव पवार नाट्यगृहा मध्ये ) रॅपिड अँटीजेन तपासणी सुरू .

कोणतीही वैद्यकीय माहिती नसताना मंगल लॅबोरेटरीला बदनाम करण्याचा प्रयत्न डाॅ.पंकज गांधी.

शनिवार दि.५ रोजी पासुन सुरु झाली आहे बारामतीतील सांस्कृतिक केंद्र (वसंतराव पवार नाट्यगृहा मध्ये ) रॅपिड अँटीजेन तपासणी सुरू .

बारामती वार्तापत्र

बारामती शहरातील नागरिकांच्या कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी मंगल लॅबोरेटरी अविरतपणे रुग्णसेवा देत असून काही जण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणतीही वैद्यकीय माहिती नसताना मंगल लॅबोरेटरीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याबद्दल या लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ. पंकज गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

बारामती – शहरातील नागरिकांच्या कोरोनाच्या रॅपिड अँटीजेन टेस्टसाठी मंगल लॅबोरेटरी अविरतपणे रुग्णसेवा देत असून काही जण गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणतीही वैद्यकीय माहिती नसताना मंगल लॅबोरेटरीला बदनाम करण्याचा प्रयत्न काही जणांकडून होत असल्याबद्दल या लॅबोरेटरीचे प्रमुख डॉ. पंकज गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

वास्तविक कोरोनाच्या काळात धोका पत्करुन मंगल परिवार रुग्णांच्या तपासणीचे काम अविरतपणे करीत आहे. केवळ व्यवसाय म्हणून या गोष्टीकडे न पाहता आम्ही सामाजिक जाणीवेतून हे काम करतो आहोत, या संकटाच्या काळात मदत व्हावी असा आमचा उद्देश आहे.

असे असताना काही जण मात्र विनाकारणच प्रसिध्दीच्या हव्यासापोटी समाजात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत. वास्तविक सर्व वैद्यकीय नीतीमूल्ये पाळून व योग्य ती खबरदारी घेऊन या तपासण्या करीत आहोत. याची खात्री कोणीही केव्हाही कोणत्याही स्वरुपात करुन घेऊ शकतात. नाकातून जो स्वॅब घेतला जातो, त्या स्वॅबच्या दर्जावर या तपासणीचा निष्कर्ष अवलंबून असतो, कोणत्याही विषाणूची अँटीजेन चुकून पॉझिटीव्ह येत नाही. स्वॅब घेताना नाकाच्या आतमध्ये वरपर्यंत जाऊन तो घेणे गरजेचे आहे. वरच्यावर स्वॅब घेतल्यास अनेकदा अहवाल निगेटीव्ह येण्याची शक्यता असते, ही बाब सर्वांनी लक्षात घ्यावी, असे डॉ. पंकज गांधी म्हणाले.

आरटीपीसीआर टेस्टसाठी नाक आणि घशातून देखील स्वॅब घेणे आवश्यक असते, असे सांगून ते म्हणाले, अनेकदा तो केवळ घशातून घेतला जातो. मात्र ही तांत्रिक बाब कोणीही लक्षात घेत नाही. कारण अनेकांना याबाबत माहिती नसते. मंगल लॅबमधील टेस्टवर काही जण आरोप करीत आहेत. आम्ही अ‍ॅन्टीजेनच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टेस्ट आरटीपीसीआर या पद्धतीने मेट्रोपोलीस लॅबोरेटरीमध्ये खात्री करतो. आमच्या आणि मेट्रोपोलीसच्या अहवालामध्ये कधीही तफावत आलेली नाही. उलट मंगल लॅबने अ‍ॅन्टीजेन टेस्ट सुरू केल्यापासून कोरोना रुग्ण हाताळणे सोपे झाले आहे. अ‍ॅन्टीजेन पॉझिटिव्ह रुग्णांचे एक्सरे, रक्ताच्या चाचणीत देखील दोष निघालेले आहेत, हे मी आवर्जुन नमूद करू इच्छितो. कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्र कोरोना योद्धाच्या रुपात लढा देत आहे. त्यामुळे कोणीही या संकटाच्या काळात वैद्यकीय क्षेत्राकडे बोट दाखवू नये. या पुढील काळात कोणी असे गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर लढाईचा मार्ग मोकळा आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. पंकज गांधी यांनी केले आहे.

दरम्यान शनिवार पासून दि.५\९\२०२० रोजी पासुन सुरु झाली आहे बारामतीतील सांस्कृतिक केंद्र (वसंतराव पवार नाट्यगृहाशेजारी) मंगल लॅबोरेटरीच्या वतीने सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत रॅपिड अँटीजेन तपासणी सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. पंकज गांधी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!