खबरदार ! बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
ग्रामीण भागापेक्षा शहरात तुलनेने अधिक रुग्ण
खबरदार ! बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
ग्रामीण भागापेक्षा शहरात तुलनेने अधिक रुग्ण
बारामती वार्तापत्र
कालपर्यंत कोरोना पंचविशीच्या आतच अडकला होता मात्र आज त्यामध्ये वाढ होत बारामती शहराची आजची एकूण रुग्णसंख्या 27 झाली आहे.
एकूण शासकीय rt-pcr 101 नमुन्यांपैकी एकूण 15 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
तर तालुक्यातील खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण 19 rt-pcr नमुन्यांपैकी 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
व एंटीजन 36 नमुन्यांपैकी 8 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बारामती ची आजची रुग्णसंख्या 27 अशी झालीआहे.
यामध्ये शहरातिल पंधरा रुग्ण व ग्रामीण भागातील बार रुग्ण आहेत. त्यामुळे बारामतीची एकूण रुग्ण संख्या आज पर्यंत 5842 व एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5522 तर एकूण मृत्यू 138 आहेत.त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याच्या वतीने करण्यात आले आहे.
बारामतीत काल आढळलेल्या रुग्णांमध्ये श्रीराम नगर सुभद्रा अपार्टमेंट येथील 38 वर्षीय पुरुष, कांचन नगर येथील 62 वर्षीय पुरुष, भोई गल्ली येथील 31 वर्षीय पुरुष, एमआयडीसी येथील 33 वर्षीय पुरुष, जुना मोरगाव रोड येथील 49 वर्षीय महिला, निरावागज येथील 40 वर्षीय पुरुष, मुर्टी येथील 36 वर्षीय पुरुष, गुणवडी येथील 25 वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक येथील 49 वर्षीय पुरुष, तांबेनगर येथील पंचवीस वर्षीय महिला, बोरी येथील 54 वर्षीय पुरुष, टी.सी. कॉलेज येथील 32 वर्षीय पुरुष, विश्वासनगर गुणवडी रोड येथील 55 वर्षीय पुरुष, बारामती शहरातील 70 वर्षीय पुरुष, 64 वर्षीय महिला, 82 वर्षीय महिला व 70 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
बारामती तालुक्यातील रॅपिड अँटीजेन तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये शिरवली येथील 33 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय युवती, 35 वर्षीय महिला, बारामती शहरातील 42 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तुम्ही घरी रहा ,सुरक्षित रहा घाबरू नका, काळजी घ्या तोंडाला मास्क लावा, सॅनीटायझर वापरा ,,अनावश्यक गर्दी टाळा