स्थानिक
खरीप हंगामासाठी पीक विम्याची 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

खरीप हंगामासाठी पीक विम्याची 23 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन
बारामती वार्तापत्र
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2020 ते 2023 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार खरीप हंगाम 2021 करीता सहभागी होण्याकरीताची पूर्वीची अंतिम मुदत 15 जुलै 2021 अशी निश्चित करण्यात आली होती. परंतू राज्यातील कोरोना पार्श्वभूमीवर विविध भागात असलेले निर्बंध विचारात घेवून शेतकऱ्यांना पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदत 23 जुलै 2021 पर्यंत करण्यात आली आहे.
तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी दतात्रय पडवळ यांनी केले आहे.