खाजगी शाळांमधील शुल्काबाबत गठित काझी समितीचा अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर
या समितीचा अहवाल दिनांक ८/6/2022 रोजीशालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.

खाजगी शाळांमधील शुल्काबाबत गठित काझी समितीचा अहवाल शालेय शिक्षण मंत्र्यांना सादर
या समितीचा अहवाल दिनांक ८/6/2022 रोजी शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
मुंबई, प्रतिनिधी
राज्यात खाजगी शाळांमधील शालेय शुल्काबाबत राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या विविध अधिनियमांतील तरतूदी व नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासकीय स्तरावर येणाऱ्या अडचणी तसेच शाळेतील शुल्काबाबत पालकांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित अधिनियमात सुधारणा करण्यासाठी मार्च २०२१ मध्ये शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्तियाझ काझी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.
या समितीचा अहवाल दिनांक ८/6/2022 रोजीशालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजितसिंह देओल, समग्र शिक्षा अभियानचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सहसचिव तथा समितीचे अध्यक्ष इम्तियाझ काझी आदी उपस्थित होते.