खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यबद्दल बंडातात्या कराडकर यांचा बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध
गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची केली मागणी
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यबद्दल बंडातात्या कराडकर यांचा बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध
गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची केली मागणी
बारामती वार्तापत्र
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल सातारा याठिकाणी बंडातात्या कराडकर यांनी अकलेचे तारे तोडत दारू विषयावरून अपमानकारक अपशब्द वापरल्याबद्दल बारामती तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या पुतळ्याचे दहन करून व जोडे मारून तीव्र शब्दांत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.
निषेधानंतर बंडातात्या कराडकर यांच्यावर कायदेशीररीत्या गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी. याकरिता बारामती शहर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश निंबाळकर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष धनवान वादक,पुणे जिल्हा समाजकल्याण दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य साधू बल्लाळ, बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष विशाल जाधव, बारामती तालुका विद्युतवितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष ॲड.रवींद्र माने बारामती तालुका सोशल मिडिया चे अध्यक्ष सुनिल बनसोडे,बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा वनिता बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष अनिता गायकवाड, बारामती शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा आरती शेंडगे,बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक विजय शिंदे, नगरसेवक नितीन बागल,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शबीर शेख,तालुका सोशल मीडिया चे उपाध्यक्ष पैगंबर शेख, तालुका सोशल मीडिया चे सरचिटणीस सूर्यकांत पिसाळ, नितीन बागल, सुधारकर माने,योगेश पवार, विकास यादव, विशाल जाधव,संभाजी लालबिगे,सुभाष मोहिते,दिपाली पवार, रेहेना शिकीलकर, विजयालक्ष्मी आळीगी, पुष्पा देवकाते, ज्योती जाधव, मंदा अमरोळे, वंदना भंडारे,जयश्री शिंदे, आशा शेलार आदींसह तालुका व शहरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.