खिलाडू वृत्तीने यश मिळणारच: आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर रवी वंजारी
बारामती मध्ये कोरोनाचे नियम पाळत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा संपन्न
खिलाडू वृत्तीने यश मिळणारच: आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर रवी वंजारी
बारामती मध्ये कोरोनाचे नियम पाळत राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा संपन्न
बारामती वार्तापत्र
प्रत्येक खेळाडू ला पराभव पण स्वीकारावा लागतो त्यावेळेस खचू नका तर खिलाडू वृत्तीने तुम्हाला यश मिळणारच असे प्रतिपादन जळगाव पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार व आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर रवी वंजारी यांनी केले.
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन च्या वतीने विविध क्रीडा प्रकारातील खेळाडू, प्रशिक्षक यांना स्पोर्ट डायमंड अवॉर्ड व विद्यार्थ्यांना स्टुडंन्ट्स स्पोर्ट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी रवी वंजारी यांनी सांगितले.
‘हलगी’ फेम गायिका राधा खुडे,ऑल इंडिया फेडरेशन कर्नाटक राज्य अध्यक्ष गजेंद्र ठाकूर,आपुलकी फौंडेशन चे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब मारकड,फेडरेशन चे राज्य अध्यक्ष आशिष डोईफोडे ,कुस्ती निवेदक प्रशांत भागवत,अप्पासो देवकाते,विशाल हंडबर,करण कुचेकर,ओंकार खुडे व आदी मान्यवर उपस्तीत होते.
पोलीस क्षेत्रात असून सुद्धा जिद्दी च्या जोरावर आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर पर्यंतचा प्रवास रवी वंजारी यांनी सांगितला
विविध क्रीडा प्रकारात योगदान देऊन खिलाडू वृत्ती रुजवणे व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हा मुख्य उद्देश ठेऊन कार्य करणाऱ्या संस्था,व्यक्ती यांना पुरस्कार देऊन त्यांचे मनोबल वाढविणे हे कार्य असल्याचे फेडरेशन चे राज्य अध्यक्ष आशिष डोईफोडे यांनी सांगितले.
या प्रसंगी गायिका राधा खुडे यांनी ‘हलगी ‘ हे गीत गाऊन उपस्थिती यांची दाद मिळवली.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार प्रशांत भागवत यांनी मानले.सदर कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळत फक्त प्रतिनिधी समवेत करण्यात आला.