स्थानिक

खेळाडूंनी दिखाऊ पेक्षा टिकाऊ व्हावे: महेंद्र चव्हाण

बारामती मध्ये सर्व क्षेत्रातील खेळाडूचा सत्कार

खेळाडूंनी दिखाऊ पेक्षा टिकाऊ व्हावे: महेंद्र चव्हाण

बारामती मध्ये सर्व क्षेत्रातील खेळाडूचा सत्कार

बारामती वार्तापत्र

कोणत्याही खेळात यश मिळवा परंतु माझ्या देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारच या उदेश्याने प्रत्यन करत राहावा व दिखाऊ पणा पेक्षा टिकाऊ बना असा सल्ला भारत श्री विजेते व वर्ल्ड चॅम्पियन बॉडी बिल्डिंग सुवर्णपदक विजेते महेंद्र चव्हाण यांनी दिला आहे.
ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन,अखिल भारतीय खेल महासंघ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील खेळाडूचा सत्कार व विविध खेळात यशस्वी झालेल्या मान्यवर खेळाडू चे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते या वेळी महेंद्र चव्हाण मार्गदर्शन करीत होते.या प्रसंगी 3 वेळा आयरमॅन झालेले सतीश ननवरे,अभिनेत्री कल्याणी चौधरी,खेल महासंघाचे समनव्यक युसूफ मलिक,खेल महासंघाचे महाराष्ट्र युनिट हेड आशिष डोईफोडे,प्रशांत भागवत, अप्पसाहेब देवकाते,शुभम इंगवले,ओंकार खुडे,विशाल हडबंर,सोमनाथ भोसले,सत्यम आवाळे,तुषार आवाळे,दादा अहिवळे, कमलेश परदेशी,दीपाली मदने,शिवांजली पवार,अकांक्षा मारकड,आप्पासाहेब मारकड,वैजीनाथ गावडे आदी मान्यवर उपस्तीत होते.सराव,आहार व व्यवसनमुक्त राहिल्यास यश नक्की मिळते असा सल्ला आयरमॅन सतीश ननवरे यांनी दिला. मोबाइल,कॉम्पुटर व टीव्ही चा वापर योग्य कामासाठी फक्त काही ठराविक वेळेत करा मैदानी खेळ जास्त खेळा जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर भारताला कोणत्याही खेळात पदक जिंकून द्या अशी मागणी अभिनेत्री कल्याणी चौधरी यांनी दिली. खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ व मैदान प्राप्त करून देण्यासाठी व खेळाडूना प्रोत्साहीत करण्यासाठी खेळाडूचा खेल महासंघाच्या वतीने सन्मान करीत असल्याचे आयोजक आशिष डोईफोडे यांनी सांगितले.आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन आनिल सावळेपाटील यांनी मानले.

फोटो ओळ: महेंद्र चव्हाण मार्गदर्शन करताना व व्यासपीठावर कल्याणी चौधरी,सतीश ननवरे ,आशिष डोईफोडे आदी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!