स्थानिक

खोमणेवाडी येथील सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सचिव ज्ञानदेव खोमणे यांनी अहवाल वाचून दाखवला

खोमणेवाडी येथील सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

सचिव ज्ञानदेव खोमणे यांनी अहवाल वाचून दाखवला

कोऱ्हाळे बुद्रुक- बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक येथील खोमणेवाडी विविध सहकारी सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कल्याण माळशिकारे होते. यावेळी अजिंठा वरील सर्व विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.

मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे, सन २०२०-२१ सालचे संस्थेचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक वाचून मंजूर करणे, २०२२-२३ या साला करता सभासदांना लागणारे कर्ज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मागण्याचा अधिकार पंचकमिटीस देणे, २०२१-२२ चा सरकारी तपासणी अहवाल वाचून दप्तरी दाखल करणे, सभासद यांच्याकडे असणारी ३०जून पर्यंतच्या थकबाकीच्या वसुली बाबत विचार करून वसुलीसाठी कडक निर्बंध राबवणे, संस्थेचे केडरचे सभासदत्व रद्द करून संस्था स्वतंत्र करणे बाबत विचार करणे, संस्थेच्या धान्य विभागाबाबत विचार करणे, संस्थेचे भाग भांडवल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, या सर्वच विषयावर सभासदांच्यात सखोल चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. सचिव ज्ञानदेव खोमणे यांनी अहवाल वाचून दाखवला तर शेवटी दिलीप साबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!