गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचं बारामतीत आगमन.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते.

गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचं बारामतीत आगमन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते.
बारामती वार्तापत्र
ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन (दि:१०) रोजी बारामतीत झालं.
बारामतीत रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली आहे.
गणेश चतुर्थीचा हा उत्सव १० दिवस चालतो जो चतुर्थीला संपन्न होतो. मात्र, कोरोना संकटामुळे यंदाही गणेश उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय. महाराष्ट्रातील गणेशोत्सवावर कोरोनाचे निर्बंध यासह मिरवणुका काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. घरगुती गणपतीच्या मूर्तींची उंची दोन फूट तर सार्वजनिक मंडळातील गणपतींच्या उंचीची मर्यादा चार फूट इतकी ठेवली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही बारामतीत सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमन बारामती सह राज्यात सगळीकडे आगमन झाल आहे .’गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे काल आगमन झालं.