इंदापूर
गणेशोत्सव व दहीहंडीत शासनाच्या नियमांचे पालन करा – पो.नि मुजावर
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

गणेशोत्सव व दहीहंडीत शासनाच्या नियमांचे पालन करा – पो.नि मुजावर
नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा
इंदापूर : प्रतिनिधी
दहीहंडी व गणेशोत्सव शासनाच्या नियमात राहून साजरा करावा, गेल्या वर्षीप्रमाणेच उत्सवासाठीची नियमावली कायम असून उत्सव शांततेत व साधेपणाने साजरे करावेत असे आवाहन इंदापूरचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी शनिवारी ( दि.२८ ) आयोजित बैठकीत केले.
संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नागरिकांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावेत.या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये अन्यथा त्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांनी दिला.
यावेळी दहीहंडी संघांचे व गणेश मंडळांचे अध्यक्ष,पदाधिकारी, इंदापूर तालुक्यातील पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी होते.