गागरगाव येथील शेतकऱ्याने दिले चिंकारा जातीच्या हरिणाला जीवदान ; वन अधिकाऱ्यांच्या केले स्वाधीन
प्राथमिक उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात केले दाखल

गागरगाव येथील शेतकऱ्याने दिले चिंकारा जातीच्या हरिणाला जीवदान ; वन अधिकाऱ्यांच्या केले स्वाधीन
प्राथमिक उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात केले दाखल
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे गागरगाव (पारेकर वस्ती) येथील शेतकरी सुखदेव पारेकर यांनी आज (दि.२) रोजी आपल्या शेतात सापडलेल्या चिंकारा जातीच्या हरिणाच्या पाडसाला वनधिकार्यांच्या स्वाधीन करून जीवदान दिले.
पारेकर वस्ती येथील सुखदेव पांडुरंग पारेकर आज सकाळी आपल्या घराशेजारील शेतात गेले असता त्यांना चिंकारा जातीच्या हरिणाचे पाडस आढळून आले. पारेकर यांनी तात्काळ इंदापूर येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून याची माहिती दिली. वनअधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी गेले.
यावेळी वनरक्षक संतोष गीते यांनी त्या चिंकारा जातीच्या हरिणाच्या पाडसाचे निरीक्षण करून ते पाडस नर या जातीचे असून अंदाजे ४० दिवसांचे असून ते अशक्त असल्याचे समजताच त्यांनी प्राथमिक उपचारासाठी त्या पाडसाला इंदापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले आहे.
विशेष म्हणजे १५ ते २० हरिणांच्या कळपात एकच नर असतो. यात चिंकारा जातीच्या हरीणाचे दर्शन दुर्मिळ असते. हे हरिण गटाने राहत असून, खुरट्या आणि शुष्क प्रदेशात हे हरीण निदर्शनास येतात. या हरिणाची उंची साधारण ६० ते ६५ सेंटीमीटर एवढी असते. तर वजन २० ते २५ किलोपर्यंत असते. या जातीच्या हरिणाच्या शिंगाची रचना देखणी असते. विशेष म्हणजे मादीलाही शिंगे असतात. पळण्याचा वेग हे या चिंकाऱ्याची वैशिष्ट्ये असतात.चिंकारा हरिणाच्या शरीरात पाणी वाचविण्याची क्षमता मोठी असते. कोरड्या प्रदेशात हे हरीण कित्येक दिवस पाण्याविना राहु शकते.
दुर्मिळ चिंकारा जातीच्या हरणाच्या लहान पाडसाचे इंदापूर शहराजवळ असलेल्या पारेकर वस्ती परिसरात दर्शन झाले आहे. या हरणाची संख्या कमी झाली असल्यानेच शासनाकडून या प्राण्याला वन्य प्राणी संरक्षण कायद्यान्वये संरक्षण मिळाले आहे.
यावेळी वनरक्षक संतोष गीते, वन कर्मचारी बाळासाहेब वाघमोडे, निखिल जगताप आदी वन कर्मचारी उपस्थित होते.