गाव तिथे शाखा एक बूथ दहा युथ उपक्रम जिल्ह्यात राबवणार – माऊली सलगर
पुणे जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी रासपचे जोरदार प्रयत्न

गाव तिथे शाखा एक बूथ दहा युथ उपक्रम जिल्ह्यात राबवणार – माऊली सलगर
पुणे जिल्ह्यात पक्ष मजबुतीसाठी रासपचे जोरदार प्रयत्न
इंदापूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय समाज पक्षाची पुणे जिल्हातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक इंदापूर येथील हॉटेल दत्तकृपा येथे संपन्न झाली.यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाढी बरोबरच गाव तिथे शाखा एक बूथ दहा युथ उपक्रम जिल्ह्यात राबवणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना यमगर म्हणाले की,पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदार संघातून पक्षश्रेष्ठी जानकर साहेबांना लोकसभेत पाठवायचे असून त्याबरोबरच पुणे जिल्ह्यातून तीन आमदार निवडून आणायचे आहेत.त्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने काम वाढवून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आगामी काळात विविध विषयांवरती आंदोलने करावीत असे त्यांनी सांगितले.
रासपचे अध्यक्ष मा.मंत्री महादेव जानकर यांचा गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बरोबरच मोठ्या प्रमाणात हालचाली दिसून येत असून पक्ष वाढीसाठी तसेच मजबुतीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाकडून जोरदार प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
सदरील आढावा बैठकीस पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील, अल्पसंख्यांक आघाडी प्रभारी शाहीद मुलाणी, पुणे जिल्हा प्रभारी किरण गोफणे, बारामती तालुकाध्यक्ष ॲड. अमोल सातकर, पुरंदर तालुकाध्यक्ष संतोष खोमणे, दौंड तालुकाध्यक्ष किसन हंडाळ, सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब बंडगर, राष्ट्रीय समाज कर्मचारी आघाडी चे संतोष कोकरे, अभिजीत बाळे, गणेश हेगडकर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, महिला आघाडी अध्यक्ष निर्मला शिंदे, उमाताई मखरे, राहुल गडदे, नवनाथ कोळेकर, मनीष जाधव ,शहाजी भाळे, स्वप्नील मेमाने शैलेश थोरात, ज्योतीराम गावडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.