गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते क्रेडाई बारामती मासिकाचे प्रकाशन संपन्न
सदर मासिक दर महिन्याला प्रकाशित होणार आहे

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते क्रेडाई बारामती मासिकाचे प्रकाशन संपन्न
सदर मासिक दर महिन्याला प्रकाशित होणार आहे
बारामती वार्तापत्र
आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित दादा पवार यांच्या शुभहस्ते व राज्यसभा खासदार सौ. सुनेत्रा वहिनी पवार व युवा नेते जय दादा पवार यांच्या उपस्थितीत क्रेडाई बारामती च्या वतीने बनवण्यात आलेले “CREDAI BARAMATI INSIGHT” या मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
मासिकाच्या माध्यमातून बारामतीच्या विकासातील ठळक मुद्दे, झालेला आणि होत असलेला विकास तसेच रिअल इस्टेट व्यवसायाला चालना मिळण्यासाठी व ग्राहकांना रिअल इस्टेटची माहिती मिळण्याबाबत एक व्यासपीठ निर्माण होण्यासाठी क्रेडाई बारामतीच्या वतीने “CREDAI BARAMATI INSIGHT” हे मासिक तयार करण्यात आले आहे. सदर मासिक दर महिन्याला प्रकाशित होणार आहे मासिकाच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायासंदर्भात आणि ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने असणारे कायदेविषयक माहितीचे लेखमाला चालू करण्यात येणार आहे.
यावेळी क्रेडाई महाराष्ट्र चे अध्यक्ष श्री.प्रफुल्ल तावरे, क्रेडाई महाराष्ट्राचे खजिनदार श्री.सुरेंद्र भोईटे, क्रेडाई बारामतीचे अध्यक्ष राहुल खाटमोडे तसेच क्रेडाई बारामतीचे 2025/ 27 नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.दत्तात्रय बोराडे उपाध्यक्ष श्री.सिद्धार्थ जाचक व क्रेडाई बारामतीचे सचिव व या मासिकाचे संपादक श्री.अमोल कावळे उपस्थित होते.