गुणवडी येथीलही एका तरुणास कोरोनाची लागण.
बारामतीत आजचा सहावा कोरोना रुग्ण.
बारामतीतील सूर्यनगरी आढळलेल्या एका रुग्णाच्या संपर्कातील संशयितांपैकी गुणवडी येथील एका तरुणास कोरोनाची लागण झाली आहे.
काल रात्री सूर्य नगरीतील रुग्णाच्या संपर्कातील व इतर रुग्णांच्या संपर्कातील 15 जणांचे स्वॅब नमुने घेतले होते, त्यापैकी 14 जण निगेटिव्ह आले आहेत.
सूर्यनगरीतील काल आढळलेल्या रूग्णाच्या संपर्कातील गुणवडी येथील एका तरुणास कोरोना ची लागण झाली. आज सकाळी इतर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व काही संशयित असे 36 नमुने घेतलेले आहेत त्याचा अहवाल प्रतीक्षेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.