गुरूवर्य बी.जी.घारेसर पथाचे अनावरण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गुरूवर्य बी.जी.घारेसर पथाचे अनावरण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते
सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या नूतन वास्तूचे उद्घाटनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले.सहयोग सहकारी गृह रचना संस्था, दि बारामती सहकारी बँक, कृषी उद्योग मूलशिक्षण संस्था, बारामती तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, बारामती तालुका दूध उत्पादक संघ, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ इत्यादी सहकारी संस्थांच्या वार्षिक सभाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या.
यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारावकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगरसेवक सचिन सातव, जि.प.माजी बांधकाम सभापती संभाजी होळकर तसेच सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.