गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इंदापूर ला धावती भेट.
नियोजित सोलापूर दौर्यावर असताना भेट.
गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची इंदापूर ला धावती भेट.
नियोजित सोलापूर दौर्यावर असताना भेट.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर दौऱ्यावर जात असता आज शनिवार दि.२७ जून रोजी सकाळी इंदापूर येथे पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या हॉटेल माऊली प्रसाद या ठिकाणी आज धावती भेट दिली.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यांचे पालकमंत्री तथा इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने,पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांसह कार्यकर्ते व पदाधिका-यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीनंतर काही वेळातच ते सोलापूच्या दिशेने रवाना झाले.
यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, तालुका उपाध्यक्ष अतुल झगडे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, शहराध्यक्ष अनिल राऊत, प्रसिध्दी प्रमुख वसंत आरडे, संजय दोशी ,नगरसेवक पोपट शिंदे, नगरसेवक अनिकेत वाघ,दादाराम झगडे, दादासाहेब सोनवणे, अशोक मखरे आदी मान्यवरांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.