गॅस सिलेंडर पाठोपाठ काडेपेटीही महागली
१४ वर्षांनंतर दरवाढ; डिसेंबर पासून दोन रुपयांना विक्री
गॅस सिलेंडर पाठोपाठ काडेपेटीही महागली
१४ वर्षांनंतर दरवाढ; डिसेंबर पासून दोन रुपयांना विक्री
बारामती वार्तापत्र
एकीकडे गॅस सिलेंडर दरवाढीने सर्वसामान्य हैराण झाले असताना आता वर्षानुवर्षे कायम १ रुपयांना मिळणाऱ्या काडेपेटीच्या किमतीही वाढल्या आहेत. डिसेंबर २०२१ पासून काडेपेटी २ रुपयांना विकली जाईल. माचीसच्या किमतीत २००७ मध्ये म्हणजे १४ वर्षापूर्वी शेवटची दरवाढ झाली होती. जी ५० पैसे होती.त्यानंतर काडेपेटी १ रुपयांना विकली जाऊ लागली.
पाच प्रमुख मॅचबॉक्स उद्योग समितीच्या प्रतिनिधींनी नुकतीच शिवकाशी येथे बैठक घेतली. या बैठकीत काडेपेटीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.उत्पादकांच्या मते काडेपेटी तयार करण्यासाठी १४ प्रकारचा कच्चा माल लागतो.१ किलो फाँस्फरसचे दर ४२५ रुपयांनी वाढून ८१० रुपयांवर पोहचले आहेत.वॅक्सची किंमतही ५८ रुपयांवरून ८० रुपय झाली आहे.
पेटीसाठी वापरात येणाऱ्या बाहेरील कागदांचे दर २६ रुपयांवरून ५५ रुपय झाले असून आतील कागद ३२ रुपयांवरून ५८ रुपयांनी महागला आहे.१० ऑक्टोबर पासून बॉक्स बोर्ड,पोटँशिअम आणि सल्फरच्या किमती वाढल्या आहेत.याशिवाय इंधनाच्या किमती वाढल्याने दळणवळणाचा खर्च वाढला आहे. या सर्व वस्तू महागल्यामुळे माचीस उद्योगालाही काडेपेटीचे दर वाढवण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.
चौकट:
तामिळनाडू मधील शिवकाशी येथे काड्यापेटी चे उत्पादन केले जाते कच्या माला मध्ये शोभेची दारू,गुल,व लाकडी साहित्य ,स्टिकर्स आदी चा खर्च वाढला आहे वाहतुक,जाहिरात मध्ये सुद्धा जास्त खर्च होत असतो त्यामुळे साइज नुसार दर वाढले जात असल्याची माहिती किराणा व्यवसाईक अमोल पवार यांनी सांगितले.
चौकट:
गॅस च्या जमान्यात लायटर चा वापर जास्त होत असताना सुद्धा काड्यापेटी चे महत्व कमी झाले नाही कारण आजच्या जमान्यात सुद्धा चूल पेटविणे पासून विविध ठिकाणी सुद्धा काड्याची पेटी म्हतपूर्ण असून धार्मिक बाबीत व व्यवसायात काड्याची पेटी वापरत असल्याचे साईनाथ केटर्निग चे संचालक साईनाथ चौधर यांनी सांगितले.