गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळांचे दरवाजे आता पुन्हा एकदा उघडणार

शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून लॉकडाउनमुळे बंद असलेल्या शाळांचे दरवाजे आता पुन्हा एकदा उघडणार

शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

राज्य सरकारने नवीन जीआर प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहणारे बंधणकारक ठरणार आहे.
राज्य सरकारने नवीन जीआर जारी केला आहे. शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्थांमधील ऑनलाइन, ऑफलाइन आणि दूरस्थ शिक्षणासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहे.

शासकीय, खासगी, अनुदानित विना अनुदानित सर्व शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू व्हावं लागणार आहे.
50 टक्के क्षमतेने उपस्थिती राहता येणार आहे.
याआधी 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने अनलॉकची नवीन नियमावली जाहीर केली होती. यात शिक्षण क्षेत्राबद्दल महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 50 टक्के शिक्षकांच्या उपस्थितीत शाळा सुरू करता येण्यास परवानगी देण्यात आली होती. 50 टक्के शिक्षकांना क्षमतेनं शाळेत येण्यास परवानगी देण्यात आली होती. परंतु, 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहे.
राज्य सरकारचा नवा आदेश
– राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दिनांक 31.10.2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्रस ऑनलाइन/ ऑफलाइन शिक्षण आणि दुरस्त शिक्षण सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.
– ऑनलाईन/ ऑफलाईन शशक्षण/ दुरस्त शिक्षण / Tele-Counselling आणि त्याच्याशी संबंशित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित, विना अनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी ऑनलाईन/ ऑफलाईन / दुरस्थ शिक्षणाशी सांबांशित कामाांसाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे

– शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, स्वच्छत्ता व इतर सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना सोबत जोडलेल्या परिषिष्टामध्ये देण्यात आल्या आहेत. तसंच या विभागाच्या संदर्भाधीन दिनाकं 15 जुन, 2020 रोजीच्या परिपत्रकातील सुचनांचे पालन करण्यात यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!