मुंबई

गेल्य तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, अभ्यास समितीने केली ‘ही’ शिफारस

कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला.

गेल्य तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, अभ्यास समितीने केली ‘ही’ शिफारस

कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला.

मुंबई:प्रतिनिधी

गेल्य तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का बसला आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून राज्यभरातील एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत.

राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नाही, असं त्रिसदस्यीय समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. कोर्टाने नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा हा अहवाल आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानसभेत पटलावर ठेवला. त्यात समितीने हे स्पष्ट केलं आहे. एसटी महामंडळाचं महाराष्ट्र सरकारमध्ये विलीनकरण व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

विलिनीकरणाची मागणी मान्य करू नये, असं शिफारस समितीनं अहवालात म्हटलंय.

महामंडळाचं स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून कर्मचाऱ्यांचं विलिनीकरण करणं या मागणीसाठी कायदेशीर तरतूद नाही, त्यामुळे ही मागणी मान्य करु नका, अशी शिफारस अभ्यास समितीनं केलीय. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी बजेटमधून पुढची चार वर्षं तजवीज करावी, अशी शिफारस समितीनं केली आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानसभेत हा अहवाल ठेवला.  त्यात हे स्पष्ट करण्यात आलं आहे. या अहवालात तीन मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तर या अहवालावरून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. तीन सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आता एसटी कर्मचारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनिकरण करावं की करू नये यासाठी कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीचाच अहवाल आज विधानसभेत मांडण्यात आला आहे.

समितीचे निष्कर्ष काय?

  1. मार्ग परिवहन कायदा 1950, इतर कायदा आणि नियम व अधिनियम तसेच प्रशासकीय बाबी विचारात घेता, महामंडळाचे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवून कर्मचाऱ्यांचे राज्य शासनामध्ये विलीनिकरण करणं ही मागणी मान्य करणं ही मागणी कायदेशीर तरतुदीनुसार शक्य नाही. सबब ही मागणी मान्य न करण्याची शिफारस आहे.
  2. त्याचप्रमाणे महामंडळाचे शासनात विलीनिकरण करून सर्व कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून समजणे व महामंडळाच्या वाहतूकीचा व्यवसाय शासनाच्या विभागामार्फत करणे ही मागणी सुद्धा मान्य करणे कायद्याच्या तरतुदीनुसार तसेच प्रशासकीय आणि व्यवहारिक बाबी विचारात घेता शक्य नाही.
  3. महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती लक्षात घेता, त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळेवल वेतन अदा करण्यासाठी किमान पुढील पाच वर्ष शासनाने त्यांच्या अर्थसंकल्पाद्वारे महामंडळास आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी समितीची शिफारस आहे. त्यानंतर योग्य वेळी महामंडळाच्या आर्थिक कामगिरीचा आढावा घेऊन पुढील आर्थिक मदतीबाबत निर्णय घेण्यात यावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram