गोखळीची कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात यश
विलिनीकरण कक्षातील रूग्ण संख्या ७ जून पासून गोखळी येथे कोरोना बांधीताची संख्या शून्यावर

गोखळीची कोरोना रुग्ण संख्या शून्यावर आणण्यात यश
विलिनीकरण कक्षातील रूग्ण संख्या ७ जून पासून गोखळी येथे कोरोना बांधीताची संख्या शून्यावर
गोखळी ; बारामती वार्तापत्र
गोखळी ( राजेंद्र भागवत यांजकडून) फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे वाढत्या कोरोना संसर्गाला आटोक्यात आणण्यासाठी गोखळी ग्रामपंचायत आणि तरूणांनी एकत्र येऊन लोकसहभागातून कोरोना विलिनीकरण कक्ष १३ मे पासून सुरू करण्यात आला. एक महिन्यात गावातील विलीनीकरण कक्षामध्ये ७४ रुग्ण डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कोरोना मुक्त होऊन त्यांला प्रत्येकी १ झाड देउन सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
विलिनीकरण कक्षातील रूग्ण संख्या ७ जून पासून गोखळी येथे कोरोना बांधीताची संख्या शून्यावर रोखण्यात यश मिळवले.
याकरिता योगदान देत असलेल्या कोरोना योध्द्याचा , दररोज मोफत सेवा देणाऱ्या गावातील डॉक्टर डॉ शिवाजीराव गावडे, डॉ अमोल आटोळे डॉ नितीन गावडे डॉ विकास खटके, डॉ सानिया शेख, आरोग्य सेविका लोंढे मॅडम, आशा वर्कस सौ दुर्गा आडके, अंगणवाडी सेविका सौ.सुरेखा आटोळे मॅडम यांचा आणि या विलिनीकरण कक्षासाठी सढळ हस्ते रोख आणि वस्तू रूपाने मदत करणारे दात्याचा कोरोना आपत्ती समितीच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.सुमनताई गावडे यांचे हस्ते झाडं देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, बारामती सहकारी बँकेचे संचालक उद्धवराव गावडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ शिवाजीराव गावडे उपस्थित होते
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ शिवाजीराव गावडे म्हणाले की, आपल्या गावातील कोरोना रूग्ण संख्या कमी झाली असली तरी यापुढेही दुसऱ्या साथीच्या पार्श्वभूमीवर ज्यांना ज्यांना अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध झाली नाही त्या सर्व लाभार्थी यादी तयार करून त्यांनां लस उपलब्ध करून देण्यात आली पाहिजे.ज्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी सरकारी लसीकरणासाठी वेळ न घालवता पैसे खर्च करून लसिकरण करून घेणं गरजेचं आहे परंतु ज्यांची लस विकत घेण्यासाठी आर्थिक नाही त्यांच्या साठी गावपातळीवर नियोजन करण्याची गरज आहे असे सांगून ते पुढे म्हणाले समाजात सतत संपर्कात असणाऱ्या लहान मुलांना, दुकानदार, कामगार यांची यादी बनवून त्यांना पहिल्या क्रमांकाने लस दिली पाहिजे असे सांगितले.यावेळी कोरोना विलिनीकरण कक्षातील ९ रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सन्मानपूर्वक सरपंच सौ.गावडे यांचे हस्ते झाडं देऊन निरोप देण्यात आला.यावेळी कोरोना कालावधीत मध्ये रात्रंदिवस काम करणारे कोरोना योध्दयाचा सन्मान करण्यात आला.यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा समितीचे सदस्य विश्वासदादा गावडे, श्रीराम बझारचे माजी संचालक मारुतराव गावडे,गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, डॉ अमोल आटोळे, डॉ नितीन गावडे, डॉ विकास खटके, डॉ.सोमनाथ वायसे , माजी सरपंच नंदकुमार गावडे, रमेश गावडे,पै.दीपक चव्हाण, सुनील अप्पा गावडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सागर गावडे, ओंकारगिरी महाराज, शेखर लोंढे, बांधकाम व्यावसायिक शांताराम गावडे, उप सरपंच डॉ अमित गावडे, पोलिस पाटील विकास शिंदे, अभिजित जगताप, ग्रामविकास अधिकारी गणेश दडस, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घाडगे, अमोल गावडे, गावकामगार तलाठी प्रल्हाद गायकवाड, सुनील मदने, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.कायक्रमाचे सुत्रसंचलन राधेश्याम जाधव तर आभार प्रदर्शन राजेंद्र भागवत यांनी केले.