गोजूबावीतील एकाला कोरोना तर बारामती तालुक्याची रुग्ण संख्या २६ वर.
सदरची व्यक्ती दौंड गोजुबावी येथे शनिवारी आली होती.
बारामती तालुक्यातील गोजुबावी येथील एका रुग्णाची (वय 40 वर्षे पुरुष ) चाचणी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सदरची व्यक्ती दौंड गोजुबावी येथे शनिवारी आली होती.
गोजुबावी या गावाची महसुल सीमा गृहीत धरुन प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येत आहे. सदर व्यक्ती ज्यांच्या संपर्कात आली असेल त्यांनी तात्काळ रुई हाॅस्पिटल बारामती येथे संपर्क साधावा.
तरी सर्व बारामती तालुक्यातील नागरिकांना विशेषता मौजे गोजुबावी गावातील नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लाॅकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये.
अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे व त्याने सॅनिटाझरचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे असे आवाहन दादासाहेब कांबळे यांनी केले.