राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल
सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची प्रकृती पुरती खंगल्याचे दिसत आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल
सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची प्रकृती पुरती खंगल्याचे दिसत आहे.
मुंबई:प्रतिनिधी
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना उपचारासाठी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अनिल देशमुख यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यामुळे देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. अनिल देशमुख यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या सहा महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत. या सहा महिन्यांत अनिल देशमुख यांची प्रकृती पुरती खंगल्याचे दिसत आहे.
त्यात शनिवार आणि रविवार दोन दिवस सुट्टी असल्याने आज सीबीआय त्यांचा ताबा घेणार होती, मात्र अनिल देशमुख यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या खांद्याचे ऑपरेशन होणार असून, अजून काही दिवस देशमुख रुग्णालयात राहणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीआयला अनिल देशमुखांचा ताबा घेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
सीबीआयला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांचा ताबा आता सीबीआयला देण्यात आला आहे. मात्र देशमुख यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यानं सीबीआय अधिकाऱ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ईडीच्या तपासानंतर आता भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पुढील चौकशीसाठी सीबीआयला अनिल देशमुख, सचिन वाझे , संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे या चौघांचा ताबा हवा होता. त्यासाठी ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या या चारही आरोपींचा ताबा घेण्यासाठी सीबीआयतर्फे मुंबई सत्र न्यायालयात करण्यात अर्ज आला होता.
त्यावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाचे डी.पी. शिंगाडे यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयचा हा अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या परवानगीनंच सीबीआयनं यांची कारागृहात जाऊन चौकशी केली होती. मात्र त्यात आरोपींनी पुरेसं सहकार्य न केल्यामुळेच केंद्रीय तपासयंत्रणेनं या चौघांचीही कस्टडीत चौकशी करण्याची मागणी करत कोर्टाकडे अर्ज केला होता.