गोपीचंद पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल;अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते काय म्हणाले..पहा..
पुतळा अनावरण प्रकरणी केली कारवाई
गोपीचंद पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल;अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते काय म्हणाले..पहा..
पुतळा अनावरण प्रकरणी केली कारवाई
जेजुरी ; बारामती वार्तापत्र रिपोर्ट
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पडळकर आज जेजुरी येथे आले होते त्या वेळी ही घटना घडली.
जेजुरी गडावर देवस्थानच्या वतीने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा अनावरण करण्याच्या कारणावरून आज हा प्रकार घडला
या पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. मात्र पडळकर यांनी त्यास आपला विरोध असल्याचे सांगत स्वतः या पुतळ्याचे औपचारीक अनावरण केल्याचे जाहीर केले. दरम्यान पोलिसांनी पुतळ्याचे अनावरण झाले नसल्याचे सांगितले.
पडळकर यांनी बेकायदा दोनशे-तीनशे जणांचा जमाव जमून जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच शासकीय कामात अडथळा आणणे, पोलिसांशी झटापट करणे या वरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईवर आज पर्यंत अनेक बेकायदेशीर उद्घाटने झाली मात्र गुन्हा कधीच कोणावर दाखल झाला नाही. आणि पडळकर यांच्यावर या प्रकरणी लगेच गुन्हा दाखल झाला असे म्हटले आहे.मात्र या सर्व प्रकारामुळे राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे.