ग्रामपंचायत सदस्यांकडून धरणे आंदोलनाचा इशारा सामान्य जनतेचे काय?
निमगाव केतकी येथे ग्रामपंचायत मासिक मिटिंग वर ग्रामपंचायत सदस्यांचा बहिष्कार

ग्रामपंचायत सदस्यांकडून धरणे आंदोलनाचा इशारा सामान्य जनतेचे काय?
निमगाव केतकी येथे ग्रामपंचायत मासिक मिटिंग वर ग्रामपंचायत सदस्यांचा बहिष्कार
प्रतिनिधी ;निलेश भोंग
विकास कामे होत नसल्यामुळे निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत मासिक मिटिंग वर बहिष्कार टाकला असून वारंवार विकास कामे करण्याचा सूचना देऊनही आम्ही विरोधी पार्टीचे असल्यामुळे आमच्या वॉर्डातील कामे केली जात नसल्याचा आरोप वार्ड क्रमांक चार मधील ग्रामपंचायत सदस्य सचिन जाधव यांनी केला आहे.गेल्या तीन महिन्यापासून प्रत्येक मासिक मिटिंग मध्ये वार्ड क्रमांक दोन, तीन, चार, मधील रस्त्यावरील मुरमीकरण तसेच स्ट्रीट लाईट यासारख्या कामांसाठी वेळोवेळी मागणी करूनही आतापर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.जर ग्रामपंचायत सदस्यांची कामे होत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय हाल होत असतील याचा विचार न केलेलाच बरा यामुळे निमगाव केतकी येथील नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून विकास कामे न झाल्यास ग्रामपंचायत समोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य सचिन अंकुश जाधव, दादाराम विठ्ठल शेंडे, सौ.रिना सुभाष भोंग,सौ.अर्चना अनिल भोंग,सौ.लता हनुमंत राऊत दिला आहे.
दीड वर्षापासून कोरोणा परिस्थिती असल्याने गावातील नागरिकांना जगण्यासाठी धडपड करावी लागत असताना त्यांच्या हाताला कुठल्याही प्रकारचा रोजगार नसताना ग्रामपंचायत मध्ये एखादा दाखला किंवा उतारा आणण्यासाठी गेले असता त्यांना पूर्ण थकबाकी भरण्याच्या सूचना केल्या जातात.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी निमगाव केतकी येथील ओढा खोली करण्याचे काम करण्यात आले. मात्र ग्रामपंचायत पाठीमागील खाजगी मालकीच्या रस्त्यामुळे गावातील गटारीचे मैलायुक्त पाणी तसेच पावसाचे पाणी साचुन या ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. परंतु या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन कुठल्याही प्रकारचे लक्ष देण्यास तयार नाही.