ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्यात-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
ॲड. झेंडे म्हणाले, सध्या ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यापासून त्यांनी जागरुक होणे आवश्यक आहे.
ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि सुविधा मिळाव्यात-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे
ॲड. झेंडे म्हणाले, सध्या ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यापासून त्यांनी जागरुक होणे आवश्यक आहे.
बारामती वार्तापत्र
ग्राहक सेवा व वस्तूंची निर्धारित किंमत देत असल्याने ग्राहकांना दर्जेदार आणि वेळेतच सेवा, सुविधा मिळायला हव्यात, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले. शासनाच्या अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभाग, तहसिल कार्यालय, अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला तहसिलदार विजय पाटील, गट विकास अधिकारी अनिल बागल, राज्य ग्राहक संरक्षण परिषद मुंबईचे सदस्य ॲड. तुषार झेंडे आदी उपस्थित होते.
श्री. कांबळे म्हणाले, माणूस हा जन्मापासूनच ग्राहकाच्या भूमीकेत असतो. सध्या बदललेल्या व्यवहाराचे स्वरुप लक्षात घेऊन शासन ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करीत असून त्यामध्ये ग्राहकाच्या हिताला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या ऑनलाईन वस्तु विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कंपन्याकडून आकर्षक जाहिराती केल्या जातात. ग्राहकांनी या जाहिरातींना बळी न पडता मालाची गुणवत्ता तपासूनच वस्तु खरेदी कराव्यात, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
ॲड. झेंडे म्हणाले, सध्या ग्राहकांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यापासून त्यांनी जागरुक होणे आवश्यक आहे. ग्राहकाला असलेल्या संरक्षणाबाबत ग्राहकाची फसवणूक झाल्यास व करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईबाबत त्यांनी माहिती दिली.
राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलीप शिंदे यांनी ग्राहक चळवळीच्या कार्याबाबत माहिती दिली. ग्राहक दिनाच्या आयोजित निबंध स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धेत यशस्वी विद्यर्थ्यांना यावेळी पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमोद जाधव, डॉ. नवनाथ मलगुंडे, दिलावर तांबोळी, श्रमीक कामगार संघटनाचे सदस्य रुक्मिणी लोणकर, यशवंत आधार प्रतिष्ठान पुणे जिल्हा संघटक दत्ता भामे, बायो डिझेल कंपनीचे ग्राहक निलेश बोबडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायक सदस्य तुषार बर्गे, शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्राहक उपस्थित होते.