ग्राहक जागरण पंधरवडा सुरु
अखिल भारतीय ग्राहक पंचायत इंदापूर तालुका यांचे वतीने
बारामती वार्तापत्र सणसर
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने आज सणसर येथे ग्राहक जागरण पंधरवड्याचा शुभारंभ झाला.
केंद्र सरकारने नुकताच 20 जुलै रोजी नवीन ग्राहक संरक्षण कायदा अमलात आणला त्या कायद्याविषयी लोकांमध्ये जाणीव, जागृती व्हावी, ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव व्हावी यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या इंदापूर तालुका यांच्या वतीने ‘ग्राहक जागरण पंधरवडा ‘आज शुभारंभ झाला. यावेळी ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप निंबाळकर ,इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक संग्रामसिंह निंबाळकर ,भाजपाचे माजी संचालक सचिन भाग्यवंत, इंदापुर काँग्रेसचे उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख विजय शिरसट, इंदापुर तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष वसंतराव जगताप,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार, महान्युज चे प्रमुख ज्ञानेश्वर रायते, दै. प्रभात चे गोकुळ टांकसाळे,ग्रामपंचायत सदस्य निवास कदम, सराफ व्यावसायिक रमेश कांबळे, सणसर केबल चे विजय भाग्यवंत, ग्राहक पंचायतीचे इंदापुर तालुका संघटक सुधीर भिसे, इंदापुर प्रवासी महासंघाचे प्रमुख वैभव निंबाळकर, गणेश निंबाळकर, तावशीचे संघटक रवी खरात हे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी सांगितले की ग्राहकांची फसवणूक झाली असेल, अडवणूक झाली असेल तर त्यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा व आपली फसवणूक होण्यापासून रक्षण करावे. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते सदैव ग्राहकांना मार्गदर्शन करण्यास कटिबद्ध आहेत.
इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे यांनी नवीन ग्राहक संरक्षण कायद्याविषयी माहिती देऊन फसवणुक झाल्यास ग्राहकांनी या कायदयाचा प्रभावी वापर करावा. नवीन कायद्यात ग्राहकांना खुप मोठे अधीकार दिले आहेत. ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीसाठी वकील देण्याची गरज नसणारे हे एकमेव न्यायालय आहे.अशी माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष वसंतराव जगताप म्हणाले की ग्राहक पंचायतीचे कार्य सामान्य ग्राहकाला दिशा देणारे आहे. ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते हे व्रतधारी असल्यामुळे कोणतीही अपेक्षा न ठेवता अनेक ग्राहकांना न्याय मिळतो. असे मत व्यक्त केले.