इंदापूर

ग्राहक पंचायतीचे कार्य कौतुकास्पद – प्रवीण माने

आज प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते झाले.

ग्राहक पंचायतीचे कार्य कौतुकास्पद – प्रवीण माने

आज प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते झाले.

इंदापूर,बारामती वार्तापत्र

अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते कोणत्याही अपेक्षे शिवाय समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला आपले प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. ग्राहक पंचायतीचे कार्य कौतुकास्पद आहे असे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण भैय्या माने यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वर्गीय संतोष बापू गांधी स्मृती पुरस्काराचे वितरण सणसर येथे झाले त्या कार्यक्रम प्रसंगी प्रवीण भैय्या माने बोलत होते.

यंदाचा पुरस्कार बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक राहुल मस्तूद यांना शासकीय अधिकारी म्हणून तर उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून संपत नाना फराटे व उपक्रमशील तालुका जुन्नर यांना जाहीर झाला . त्याचे वितरण आज प्रवीण भैय्या माने यांच्या हस्ते झाले. ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्याने समाज शरण वृत्तीने काम करावे समाजातील सामान्य माणसाला आपल्या कार्यातून न्याय मिळावा व संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून सामाजिक कार्यात लागणारी मदत करण्यास आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले तर तुषार पाटील यांनी ग्राहक संरक्षण कायद्याची पार्श्वभूमी सांगितली रमेश टाकळकर यांनी महसूल कायदा विषयी मार्गदर्शन केले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड ,छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील , संचालक ॲड रणजीत निंबाळकर ,डॉक्टर दीपक निंबाळकर, ग्राहक पंचायतीचे महसूल समिती प्रमुख रमेश टाकळकर ,प्रवासी परिवहन प्रमुख ॲड तुषार झेंडे जाचक वस्ती चे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर, उपाध्यक्ष अशोक भोर, भानुदास सरडे, ग्राहक राजा मासिकाचे उपसंपादक दिलीप फडके ,राघवदास चौधरी , शिवाजी रायते, वैशाली आडसरे, वैभव निंबाळकर ,महेश पाटील ,अनिल पवार ,सुधीर भिसे ,मधुकर शेंडे, तानाजी खैरे ,शरद पवार ,गणेश शेंडे, भारत विठ्ठलदास ,जगदीश पडवळ, गोरख हरिहर च्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष दिलीप निंबाळकर यांनी केले व सूत्रसंचालन इंदापूर तालुका अध्यक्ष किशोर भोईटे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!