घरोघरी सुकन्या भारी” अभियानास सुरुवात.
बारामती:वार्तापत्र मुलगी वाचवा,मुलगी शिकवा व स्रीब्रून हत्या करू नका असा सल्ला बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सरचिटणीस रोहिणी आटोळे यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 21 व्या वर्धापनदिना निम्मिताने “घरोघरी सुकन्या भारी” राष्ट्रवादी युवती काँग्रेस राज्य अभियान या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अनेक उपक्रम राबविले जात आहेत याच उपक्रमाअतंर्गत गुरुवार दि.18/06/2020 रोजी बारामती तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने हा उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी रोहिणी आटोळे बोलत होत्या या प्रसंगी शहर उपअध्यक्षा प्रियांका खरतोडे व युवती राष्ट्र वादी काँग्रेस च्या सहकारी उपस्तीत होत्या .
“मुली सुद्धा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून आपली स्वतः ची ओळख निर्माण केली आहे व राष्ट्र उभारणीत म्हतपूर्ण स्थान निर्माण केले” असल्याचे प्रियांका खारतोडे यांनी सांगितले. या वेळी रोहिणी आटोळे व प्रियांका खारतोडे यांनी बारामती विद्या प्रतिष्ठान व प्रेरणा वस्तीगृहात मुली व महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले.
आभार मुखध्यापिका मनीषा कोकरे यांनी मानले व उपस्तितांचे स्वागत मेधा शेलार यांनी केले सदर अभियान प्रत्येक गावात राबविण्यात येणार असून सामाजिक बांधिलकी म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप महिला व मुलींना करण्यात येणार असल्याचे रोहिणी आटोळे यांनी सांगितले.