
घोडे व्यवसायिकांचा इंदापूर तहसील कचेरीवर घोड्यासह मोर्चा…
25 हून अधिक घोड्यांचा समावेश
इंदापूर:प्रतिनिधी; बारामती वार्तापत्र
.मात्र त्याही पलिकडे लग्न समारंभात महत्वाचा असणारा वारु म्हणजे घोडा या प्राण्याला देखील याच्या झळा सोसाव्या लागत आहेत.कोरोना लाॅकडाऊन च्या आपत्कालीन कालावधीत घोडे व्यवसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला असून घोडे मालकांना त्यांची व घोड्याची उपजीविका चालवणे अशक्य झाले आहे. आर्थिक बजेट कोलमडल्याने घोड्याचे पालन पोषण करणे अवघड झालेल आहे. लाॅकडाऊन च्या संकटाने विविध व्यवसायिकांनी मोर्चा काढल्याचे आपण पाहिले आहे मात्र पुण्याच्या इंदापूर मध्ये चक्क घोडे व्यवसायिकांनी वारुंचा मोर्चा काढत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
घोडे व्यवसायिकांनी परीस्थिती अशी झाली आहे की सांगताही येइना अन सोसनाही त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील घोडे व्यवसायिकांनी तहसील कार्यालयावर वारुंचा म्हणजे घोड्यांचा वाजत गाजत मोर्चा काढत अनोखे आंदोलन छेडले. इंदापूर तालुक्यात अशा पध्दतीने निघालेला हा पहिलाच मोर्चा आहे. प्रत्येक घोड्याला महिना पाचशे किलो खाद्य मिळावे, त्यांना आरोग्य सेवा मोफत मिळावी, घोड्यांना शासकीय विमा योजनेमध्ये समाविष्ट करावे, घोडे व्यवसायिक यांना पाच हजार रुपये मानधन मिळावे, तालुकास्तरावर घोड्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांची नियुक्ती करावी अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार डि.एस.लावंडे यांना देण्यात आले आहे. सदर मागण्या आंदोलक व पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी केल्या आहेत.