चांगल्या विचारांपासून फारकत न घेणारे भाई दीपस्तंभ म्हणून सर्वांसाठी आदर्श – डॉ. एम. के. इनामदार.
'भाई आणि आम्ही 'या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.एम.के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
चांगल्या विचारांपासून फारकत न घेणारे भाई दीपस्तंभ म्हणून सर्वांसाठी आदर्श – डॉ. एम. के. इनामदार.
‘भाई आणि आम्ही ‘या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.एम.के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित केलेले कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष गोकुळदास शहा यांच्या ‘भाई आणि आम्ही ‘या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांनी वरील मत व्यक्त केले.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांनी या पुस्तकाचे शब्दांकन केले.गोकुळदास (भाई) शहा यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त एका छोटेखानी समारंभामध्ये डॉ.एम. के. इनामदार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
डॉ. एम. के. इनामदार म्हणाले की,’ मानवी जीवन जगत असताना विचारांची जडणघडण आवश्यक आहे. मात्र चांगल्या विचाराची कधीही फारकत न घेता समाजसेवा करत आपले कुटुंब आदर्श सांभाळणारे व्यक्तिमत्व हे आपल्या सर्वांसाठी दीपस्तंभ म्हणून आदर्श आहेत. चांगल्या विचारापासून भाईंनी कधीही फारकत घेतली नाही. वय 85 वर्षे असताना देखील आपल्या आरोग्याची निगा आणि काळजी घेतली.आपल्या आयुष्याचे 100 वर्ष पूर्ण करावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.’
डॉ. विद्युत शहा म्हणाले की भाईंचे व्यक्तिमत्व हे महासागरासारखे प्रचंड आहे. भाईंच्या मते जे काम आपण करणार आहोत ते सचोटीने करा त्यासाठी सततचा ध्यास घेतला पाहिजे.’
भाई आणि आम्ही या पुस्तका विषयी माहिती देताना मुकुंद शहा म्हणाले की,’ भाईंचा जन्म 10 ऑगस्ट 1936 साली झाला. या लॉकडाऊन काळामध्ये त्यांच्याबरोबर गप्पा मारत त्यांच्या चांगल्या तसेच इतर विचारांच्या गप्पा गोष्टीततून हा पुस्तक संग्रह तयार झाला.भाई म्हणजे एक महाकाव्य असून स्वातंत्र्यसेनानी नारायणदास रामदास शहा यांचा ठसा आणि जडणघडण यांच्यातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. हे पुस्तक ध्येयवादाने जे काम करतात, समाजामध्ये वेगळा आदर्श निर्माण करतात त्यांना प्रेरणादायी आहे.’
यावेळी डॉ. संजय शहा, शकुंतला शहा, मालती शहा, वैशाली शहा, राणी शहा आणि मान्यवर उपस्थित होते.
इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन अंगद शहा यांनी केले. आभार नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी मांडले.