सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्याचे विक्रमी ऊस उत्पादन.
सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन

सेंद्रिय शेतीतून शेतकऱ्याचे विक्रमी ऊस उत्पादन.
सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील जळगाव क .प (ता. बारामती )येथील निलेश जगताप यांनी ऊसाची प्रयोगशील सेंद्रिय शेती सुरू केली आहे. एकूण सहा एक रातील शेतीत लागवडीचा ऊस, खोडवा तसेच भाजीपाला ,मका अशी पिके ते घेतात. ऊसाची सेंद्रिय शेती करत त्यांनी उत्तम व्यवस्थापन प्रयोगशीलता व सूत्रबद्ध शेती नियोजनाचा आदर्श प्रत्यय दिला आहे .
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील जळगाव क .प येथे निलेश जगताप यांचे कुटुंब शेतात राबते त्यांच्याकडे एकूण सहा एकर शेती आहे. निलेश हे त्यांच्या आई व पत्नीच्या सहकार्याने शेती करतात .पूर्णपणे शेतीला वाहून घेतलेले हे कुटुंब सेंद्रिय ऊस शेतीत प्रगतशील ठरले आहे .सातत्याने शेतीत प्रयोग करण्याच्या मानसिकतेतून शेती फायदेशीर करण्याचा यांचा प्रयत्न राहिला आहे.
सेंद्रिय शेतीचे सूत्रबद्ध नियोजन:निलेश जगताप हे 86032 या उसाच्या जातीची लागवड करतात .शेतीत ते कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर करत नाहीत .सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब केल्यामुळे त्यांना दुप्पट नफा झालेला आहे.
सामान्यतः एकदा काढणीला आलेला ऊस दुसऱ्या वेळेस एकदाच पुन्हा उगवतो परंतु सेंद्रिय खतांचा वापर केल्यास तोच तीन वेळा फुटतो प्रत्येक वेळी काढणीनंतर ते शेतात शेणखताचा वापर करतात. पिकाच्या उत्तम वाढीसाठी ते विविध प्रकारच्या खतांचा वापर करतात त्यात प्रामुख्याने जीवामृत, अमृतपाणी, धान्याची स्लरी ,शेणखत, लेंडी खत यांचा वापर करतात.
सेंद्रिय शेती ही एक स्थायी आणि पर्यावरणास अनुकूल अशी उत्पादन प्रक्रिया आहे, ज्यामध्ये लहान शेतकऱ्यासाठी विशिष्ट लाभ आहेत. तसेच रासायनिक खतांचा मानवी शरीरास होणारे दुष्परिणाम पाहता सर्वांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करावा असा संदेश निलेश जगताप यांनी दिला आहे.