चार वर्षांची पीडित बालिका घराजवळ खेळत असताना,कुरकुरे देण्याच्या बहाण्याने 30 वर्षीय बिहारी तरुणा अत्याचार!
मुलगी रडत घरी आल्यानंतर आईने तिला कारण विचारलं

चार वर्षांची पीडित बालिका घराजवळ खेळत असताना,कुरकुरे देण्याच्या बहाण्याने 30 वर्षीय बिहारी तरुणा अत्याचार!
मुलगी रडत घरी आल्यानंतर आईने तिला कारण विचारलं
क्राईम ; बारामती वार्तापत्र
चार वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन बिहारी मजुराने चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीनंतर 30 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मन्नूकुमार मनोज सिंग (वय 30, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित कुटुंब पुण्यातील लोणी काळभोर परिसरात राहतं. तर मूळ बिहारचा असलेला 30 वर्षीय आरोपीही तिथेच मजुरी करतो. चार वर्षांची पीडित बालिका घराजवळ खेळत असताना आरोपी मजुराने कुरकुरे खायला देण्याचा बहाणा करुन तिला जवळ बोलावलं. त्यानंतर चिमुरडीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
कशी उघडकीस आली घटना?
मुलगी रडत घरी आल्यानंतर आईने तिला कारण विचारलं. त्यावेळी तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. लोणी काळभोर पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीनेही गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याला सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुण्यात बालिकेवरील बलात्काराची पुनरावृत्ती
पुण्याच्या विमाननगरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना काही महिन्यांपूर्वीही समोर आली होती. एका हॉटेलच्या सुरक्षारक्षकाने पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पीडित चिमुरडी आपल्या आई-वडिलांसोबत एका लेबर कॅम्पमध्ये राहत होती. आई-वडील दोघेही कामावर गेल्यानंतर ती घरी एकटीच असते, हे आरोपीने हेरले होते. दुपारच्या सुमारास पाच वर्षांच्या चिमुरडीला तिच्या घरातून बाहेर बोलावत आरोपीने तिला आपण काम करत असलेल्या हॉटेल शेजारील एका चारचाकी शोरुमच्या पार्किंगमध्ये नेलं होतं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता.