चालू गळीत हंगामामध्ये कर्मयोगी कारखान्याने तालुक्यात ३०० कोटी रुपयांची उलाढाल केली – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
कर्मयोगी परिवार संवाद अभियानास शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
चालू गळीत हंगामामध्ये कर्मयोगी कारखान्याने तालुक्यात ३०० कोटी रुपयांची उलाढाल केली – माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
कर्मयोगी परिवार संवाद अभियानास शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
इंदापूर : प्रतिनिधी
कर्मयोगी परिवार संवाद अभियानाअंतर्गत शिरसोडी येथील सभेत बोलताना राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील म्हणाले की,अडचणीतून मार्ग काढीत कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामामध्ये ११ लाख मे.टनाचे ऊस गाळप करून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने एकूण ३०० कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.
गळीत हंगाम सुरू करतानाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहता सुरुवातीला अनेक प्रश्न, अनेक अडचणी होत्या मात्र यातून कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने मार्गक्रमण करीत आज पर्यंत ११ लाख मे.टन उसाचे गाळप करून त्यांची बिले दिली आहेत. इंदापूर तालुका स्वाभिमानाने राजकारण करणारा तालुका आहे. नीरा भीमा सहकारी साखर कारखाना आणि कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील २२००० एकरांची ऊसतोड झाली आहे. दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कर्मयोगी कारखान्याने पुढच्या वर्षी १५ लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
साखर कारखानासंदर्भात ९८०० कोटी रुपये इतका इन्कम टॅक्स माफ करण्याचा धडाडीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतला.सभासद शेतकऱ्यांनी ऊसाच्या नोंदी वेळेत द्याव्यात. ऊस उत्पादकता वाढविण्यासंदर्भात कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून विविध उपाय योजनेसह कार्यक्रम राबविण्यात येईल.’यावेळी भाऊसाहेब चोरमले ,राजेंद्र पवार, बळीकाका बोंगाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, अँड.कृष्णाजी यादव, अतुल व्यवहारे, पराग जाधव, अशोक इजगुडे, रघुनाथ राऊत, राजेंद्र चोरमले, बाबूराव पाडुळे, नारायण व्यवहारे, देविदास सातव, महेंद्र रेडके, सतीश व्यवहारे, कुबेर पवार तसेच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.