आपला जिल्हा

चिंकारा खाल्ल्यास खतरनाक विषाणू शरीरात प्रवेश करणार :डॉ महेश गायकवाड.

चिंकारा खाताय शिकऱ्यांनो मग घ्या नवा विषाणू आवश्य घ्या.

चिंकारा खाल्ल्यास खतरनाक विषाणू शरीरात प्रवेश करणार :डॉ महेश गायकवाड.

चिंकारा खाताय शिकऱ्यांनो मग घ्या नवा विषाणू आवश्य घ्या.

बारामती:वार्तापत्र चिंकारा हरीण खाल्ल्यास त्याच्या शरिरातील विषाणू खाणाऱ्याच्या शरीरात प्रवेश करतो अशी माहिती पर्यावरण व वन्यजीव अभायस्क डॉ महेश गायकवाड यांनी दिली.

चिंकारा म्हणजे रिफ्ट व्हॅली ताप आपल्याला मरणदायी यातना देऊ शकतो, यापुढील काळात जे वन्यजीव नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांच्यामध्ये असणारे विषाणू व जिवाणू दुसऱ्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतील यात आता अजिबात शंका घेऊ नये.

माणसाला सुधारायचं नाही वाटतं, मात्र शिकऱ्यांनो शिकार बंद करणार नसाल तर अजूनही अनेक विषाणू हल्ले होतील. अजूनही कोरोनाची लाट कसलीच संपलेली नसतानादेखील माणसातले शिकारी आजही वन्य जीवांना मारून खाण्याचे काम करत आहेत.

अगदी रानडुक्कर किंवा इतर प्राण्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मरण यातना देत आहोत आपण, मात्र लक्षात ठेवा प्रत्येक शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांच्या अंगात असणारे जीवाणू आणि विषाणू माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. हत्तींची संख्या कमी होत असताना जर हत्ती संपलेच तर त्याच्या अगोदर त्यांच्यामध्ये असणारे विषाणू दुसऱ्या जीवांच्या शरीरात प्रवेश करतात आणि मग त्यात पाळीव प्राणी असतील तर आपल्या पर्यंत ते विषाणू सहज पोचतात.

बारामती परिसरात चिंकाराची शिकार झाल्याची घटना वाचून खूप वाईट वाटले मात्र या शिकाऱ्यांना माहितीही नसेल आपल्यामध्ये या हरणांच्या मांसामुळे किंवा रक्तामुळे अनेक घातक विषाणू आपल्या संपूर्ण शरीरात मिसळून आपल्याबरोबर इतर माणसांना सुद्धा याचा संसर्गजन्य रोग पसरू शकतात. चिंकारा मधील एक विशिष्ट विषाणू मुळे प्रचंड ताप येऊन माणसं दगावू शकतात. अहो त्याचा शरीरात असे पर्यंत असे विषाणू त्याला त्रासदायक नसतात, मात्र ते जर आपल्यापर्यंत आले की समजा, आपले मरणच.

आपण हरणाचे मांस खाल्ले किंवा रक्ताचा संबध माणसाशी आला की मग मानवाला क्षमा नाही.

आपल्या परिसरात डेंगी, गोचीड ताप, चिकन गुणिया हे आजार वाढत आहेत कारण ऐकलं तर आपला सुद्धा विश्वास बसणार नाही मात्र गवताळ माळरान नष्ट होतायत हे कारण आहे यामागे.

ससे खाणाऱ्या लोकांना सुद्धा मला सांगावेसे वाटते की यामुळे तुलारेमिया हा विषाणू आपल्या शरीरात सहज प्रवेश करू शकतो. रानडुक्कर खात असताना त्या शिकाऱ्यांना माहिती नसते की निपाह हा विषाणू आपल्यापर्यंत आलेला आहे. मात्र तरीही लोक शिकारी करतात हे खूप दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे.

त्यामुळे चिकांरा हरीण खाऊ नका असा सल्ला डॉ महेश गायकवाड यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!