इंदापूर
छत्रपती कारखान्याच्या कार्यकारी संचालकांचे निधन
अनारसे हे सत्ताधारी- विरोधक सर्वांशी मिळून मिसळून वागत असल्याने त्यांचा सर्वांशी जुळवून घेण्याचा स्वभाव सुपरिचित झाला होता.

बारामती वार्तापत्र
सणसर ,तालुका इंदापूर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक गोविंद अनारसे यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.
अनारसे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे कामकाजही पाहिले होते त्यानंतर त्यांची छत्रपती कारखान्यात निवड झाली होती त्यांना कर्करोगाने ग्रासले होते उपचार करून ते कारखान्याच्या दैनंदिन कामकाजात भाग घेत होते मात्र त्यांचे आज निधन झाले त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.