छत्रपती कारखान्याने घेतली उभारी
इतिहासात छत्रपती चे उच्चांकी गाळप
बारामती वार्तापत्र
छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा आजपर्यंत कारखाना डबघाईला चालला आहे ,आर्थिक स्थिती खालावली आहे अशाच बातम्या आपण आजपर्यंत ऐकत आलो मात्र आजची बातमी जरा वेगळी आणि कारखान्याच्या इतिहासातील महत्वाची बातमी आहे. आज कारखान्याने एका दिवसात विक्रमी गाळप करत आठ हजार 374 टन उसाचे गाळप केले.
छत्रपती कारखान्याची गाळप क्षमता साडेसहा हजार टन प्रतिदिन अशी आहे. मात्र योग्य नियोजन करून आज 80374 टन उसाचे गाळप कारखान्याने केले त्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
छत्रपती कारखाना नेहमीच वेगवेगळ्या राजकीय कारणांनी चर्चेत असतो मागील एक दीड महिन्यापासून पृथ्वीराज जाचक यांचा कारखान्यात झालेला प्रवेश त्यांनी आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन प्रशांत काटे व संचालक मंडळ यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली व कारखान्याचे कामगार सभासद ऊसतोड मजूर सर्व अधिकारी यांच्या सहकार्याने कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
कारखान्याचा नुकताच पहिल्या वीस गाळप जादा करणाऱ्या कारखान्यांमध्ये समावेश झाला आहे.