छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक मध्ये हटवल्या प्रकरणी बारामती शिवसेनेच्यावतीने जोडे मारू आंदोलन.
जिल्हाप्रमुख राजेंद्रभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक मध्ये हटवल्या प्रकरणी बारामती शिवसेनेच्यावतीने जोडे मारू आंदोलन.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक मध्ये हटवल्या प्रकरणी बारामती शिवसेनेच्यावतीने जिल्हाप्रमुख राजेंद्रभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली भिगवण चौक बारामती येथे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.
तसेच कर्नाटक सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडी मारून,छत्रपती शिवाजी महाराज की जय… कर्नाटक सरकारचा निषेध असो…., बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद… शिवसेना जिंदाबाद… अशा घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र काळे म्हणाले कि,एकमेव विश्वव्यापी हिंदुवादी पक्षाची सत्ता आसणार्या कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुका #मणगुत्ती गावात 2 दिवसांपूर्वी अश्वारूढ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली होती, पण तेथील काही स्थानिक लोकांनी आणि तथाकथित प्रादेशिक अस्मिता मिरवणाऱ्या संघटनांनी या प्रतिष्ठापणेला तीव्र विरोध करत आणि कर्नाटक प्रशासनाने त्यांचीच बाजू घेत गतरात्री ही मूर्ती चौथऱ्यावरून हटवली.
का खुपतात छत्रपती महाराज या लोकांच्या डोळ्यात? ते हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत म्हणून? मराठा आहेत म्हणून? मराठी भाषिकांचे आराध्य आहेत म्हणून? की याना कावीळ झाले छत्रपती शिवाजी महाराज या नावाची?
कर्नाटकात भाजपची सत्ता आहे म्हणून अश्या गोष्टींना महत्व मुद्दामहून दिले जात नाही, जर महाराष्ट्र मध्ये घडले असते तर या बाबत मोठ्याले लेख, पोस्ट, अर्णव सारखे भुंकून त्याच्या सीबीआय तपासाची मागणी करत अक्षरशः हलकल्लोळ झाला असता.
या प्रकरणी सर्व शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन कर्नाटक प्रशासनाने समाजकंटक लोकांवर कायदेशीर कारवाही करावी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सन्मानपूर्वक करावी, अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली
यावेळी शिवसेनेच्या बारामती तालुका पदाधिकाऱ्यांना अटक करून शहर पोलीस स्टेशन येथे नेऊन सोडण्यात आले… यावेळी समन्वयक भीमराव आप्पा भोसले तालुकाप्रमुख विश्वास मांढरे, राजेंद्र पिंगळे, निलेश मदने, सतीश अण्णा काटे, पप्पू माने,सर्वेश वाघ, सुभाष वाघ, निखिल देवकाते,उमेश दुबे, रंगनाथ निकम, अविनाश कदम, आदेश काळे, शौकत बागवान. राजेंद्र गलांडे, सूर्यकांता आगम, तानाजी गायकवाड, विजय हिरवे, निखिल देवकाते गोकुळ काका रेडे, वगैरे कार्यकर्त्यांना अटक करून सोडण्यात आले.