छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच महाराष्ट्र सरकारची दमदार वाटचाल सुरु- उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच महाराष्ट्र सरकारची दमदार वाटचाल सुरु- उपमुख्यमंत्री अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वंदन
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राचं आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आजही महाराजांचे कार्य, त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अभिवादन केले.
पुण्यदिनानिमित्त अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी डगमगायचं नाही. जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येतं हे महाराजांनी वारंवार सिद्ध केलं. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरु राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यदिनी त्यांना अभिवादन करताना व्यक्त केला.