छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवाजी उद्यान येथे सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
बारामती:वार्तापत्र
छत्रपती शिवाजी महाराज जयंती चे औचित्य साधून बारामती शहरातील शिवाजीमहाराज उद्यानात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आले याचे उद्घाटन 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आले .
दरवर्षी प्रमाणे मोठया प्रमाणात होणारी मिरवणूक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळून सदर कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे आशा सामाजिक उपक्रमाचे कौतुक नागरिकांकडून होत आहे
या कॅमेरा मुळे गैर कृत्यांना आळा बसणार असून भविष्यात सिसी टिव्ही कॅमेऱ्यांचा उपयोग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा ठरणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील बारामतीचे तहसीलदार ,उपविभागीय प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, गटनेते सचिन सातव, विरोधीपक्षनेते सुनील सस्ते, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, समीर ढोले, ॲड भार्गव पाटसकर ,प्रणव सोमानी, विक्रम अमराळे ,राहुल हिरेमठ, सुजित जाधव ,गणेश कदम ,धीरज पवार ,योगेश ढवाण यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व पुष्पहार घालून सीसीटीव्ही कॅमेरे चालू करण्यात आले.