जंक्शन ग्रामपंचायतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आकारला दंड
मास्क न लावल्याने दंड.
बारामती वार्तापत्र
जंक्शन ता.इंदापूर येथील ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना मास्क न लावल्याने शंभर रुपयांचा दंड आकारला असून राज्यमंत्र्यांनीही दंड त्वरित भरून आपली चूक सुधारली आहे.
राज्यमंत्र्यांना ग्रामपंचायतीने दंड आकारल्याची पावती इंदापूर तालुक्यातील अनेकांच्या सोशल मीडिया अकाउंटवर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून राज्यमंत्र्यांना दंड केल्याची राज्यातील पहिलीच घटना असल्याचे सर्वत्र चर्चा आहे.
दरम्यान राज्यातील कोरोनाचे संकट अजूनही कमी झाले नसून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.