
जंक फूड पेक्षा सूप महत्वाचे : आशा केदारी
सूप च्या माध्यमातून आरोग्याचा महामंत्र
बारामती वार्तापत्र
व्यायाम केल्यानंतर खरी गरज असते ती म्हणजे शरीराला योग्य प्रोटीन,खनिज द्रव्ये ची गरज असते त्या साठी एकाच छताखाली सर्व मिळावे आणि ग्राहकांचा वेळ व पैसा वाचवा आणि जंक फूड पेक्षा शरीराला खरी गरज असणाऱ्या विविध पदार्थाचे सूप ची असून त्या साठी सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे श्रीमती आशा काशिनाथ केदारी यांनी सांगितले.
वीर सावरकर स्वीमर्स क्लब च्या शेजारी स्वयं प्रेरित बचत गटाच्या वतीने संचालिका श्रीमती आशा केदारी यांनी स्वयंप्रेरीत सूप अँड सॅलाड सेंटर च्या वतीने बीट, गाजर, शेवगा, भोपळा, टोमॅटो, कोरफड, चे सूप व प्रोटीन स्पाउट सॅलाड आदी ची विक्रीचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आशा केदारी बोलत होत्या या प्रसंगी डॉ. पांडुरंग गावडे,डॉ सचिन बालगुडे, डॉ सचिन कोकणे व वीर सावरकर स्वीमर्स क्लब चे सचिव विश्वास शेळके,उद्योजक संजय खटके,इरफान तांबोळी, जमीर शेख, संतोष कुलकर्णी जलतरणपटू वरदा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्तीत होते.
सूप घेतल्याने हिमोग्लोबिन वाढते, रक्तदाब नियंत्रित होतो ,पचन संस्था सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, केस व त्वचेचे आरोग्य सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते, हाडे मजबूत होतात, हृदयाच्या आरोग्यासाठी सूप महत्वाचे असल्याचे डॉ पांडुरंग गावडे यांनी सांगितले. डॉ महेश शिंदे यांनी आभार व्यक्त केले.