जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते,बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते,बारामतीचे माजी खासदार संभाजीराव काकडे यांचं निधन
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.
बारामती वार्तापत्र
जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, 3 मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. लाला या नावाने ते अधिक प्रसिद्ध होते.
संभाजीराव काकडे यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते बारामती येथील निंबूत गावातील सधन शेतकरी कुटुंबातील होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. जनता पक्षाची प्रदीर्घ काळ धुरा सांभाळणारे आणि राज्यातील अनेक राजकीय नेत्यांना घडवणारे म्हणून संभाजीरावांची ओळख होती.
संभाजीराव काकडे साहेब सामान्य जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीनं कार्य करणारे नेते होते. शेतकरी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या उन्नतीसाठी त्यांनी जीवनभर काम केले.
पुणे जिल्ह्याच्या विकासात मोलाचं योगदान दिलं. राजकारण, समाजकारण, सहकार अशा समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात कार्य करणारं ध्येयवादी, तत्वनिष्ठ नेतृत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील. संभाजीराव काकडे साहेब सार्वजनिक जीवनात ‘लाला’ नावाने परिचित होते. त्यांचं निधन ही पुणे जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी आहे.
संभाजीराव काकडे यांची कारकीर्द
1978 मध्ये भारतीय लोक दल तर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर
1982 मध्ये जनता दल तर्फे बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर
सोमेश्वर साखर कारखाना खरेदी विक्री संघ इत्यादी संस्थाशी पूर्वी संबंधित होते
श्रमदान ग्रंथालयाचे 1972 मध्ये उद्घाटन केल्यानंतर 16 वर्षे अध्यक्षपदी
बारामती लोकसभा मतदारसंघातून ते दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यापूर्वी आमदार म्हणून त्यांनी जनसेवा केली. जनता पक्ष व समाजवादी चळवळीचे ते बिनीचे शिलेदार होते. प्रदेश जनता दलाचे ते अध्यक्ष होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, मावळ, आंबेगाव येथील आदिवासींसाठी त्यांनी हिरडा उत्पादक संघाची स्थापना केली होती.
साखर कारखाना व तत्सम सहकार क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले होते. संभाजीराव साहेबराव काकडे 1971 साली पुणे स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघातून आमदार झाले. 1977 रोजी जनता पक्षाच्या वतीने बारामती मतदार संघाततून खासदार म्हणून निवडून आले. 1982 साली ते पुन्हा जनता दलाचे खासदार म्हणून निवडून आले. 2 वेळा खासदार आणि 1 वेळा आमदार म्हणून त्यांनी लोकप्रतिनित्व केले. संघटना काँग्रेस, जनता पक्ष व जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आदिवासी भागासाठी त्यांनी क्रीडा प्रकल्प उभारला. पुणे जिल्हा कांदा उत्पादन संघटनेची स्थापना त्यांनी केली होती.