जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने रेशन किटचे वितरण
देशात लागू असलेल्या लॉकडाऊन मुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळवण्यात अडचणी येत आहेत.ही अडचण दूर करण्यासाठी तसेच गरजूंना मदत करण्याच्या हेतूने जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने रेशन किटचे वितरण करण्यात येत आहे.
काल नगर शहरातील पाईपलाईन रोड हडको, यशोदानगर, नित्यसेवा, श्रमिक बालाजी मंदिर परिसर, भिंगारदिवे मळा, तारकपूर, तोफखाना, सावेडी गाव, ढवण वस्ती, तपोवन रोड, बोल्हेगाव येथील म्हसोबा चौक, राघवेंद्र स्वामी मंदिर परिसर, रेणुका नगर भागात रेशन किटचे वाटप केले.
याप्रसंगी शहर जिल्हाअध्यक्ष श्री. महेंद्र गंधे, महापौर श्री. बाबासाहेब वाकळे, श्री. स्वप्नील शिंदे, श्री. रवींद्र बारस्कर, श्री. धनंजय जाधव, श्री. निखिल वारे, श्री. मनोज दुल्लम, श्री. सतीश शिंदे, श्री. दिगंबर ढवन, श्री. भालचंद्र भाकरे, श्री. महेश तवले, श्री. रवी गूडा, श्री. संपत नलावडे, श्री. बाळासाहेब पवार, श्री. उदय कराळे, श्री. कुलदीप भिंगारदिवे, श्री. अमित गटणे, श्री. दत्तात्रय सप्रे, श्री. अमोल लगड, श्री. मदन आढाव, श्री. आकाश कातोरे व नागरिक उपस्थित होते.