जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न…
२२२ विद्यार्थी व १४ शिक्षकांनी शैक्षणिक सहलीच्या प्रवास केला

जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न…
२२२ विद्यार्थी व १४ शिक्षकांनी शैक्षणिक सहलीच्या प्रवास केला
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल शनिवार दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री बनेश्र्वर महादेव मंदिर, नसरापूर व बालाजी मंदिर, केतकावळे या ठिकाणांना भेट देत व देवदर्शन करत उत्साहात संपन्न झाली.
सकाळी सकाळी लवकर एस.टी. महामंडळाच्या चार बस मध्ये बसून विद्यालयातील २२२ विद्यार्थी व १४ शिक्षकांनी शैक्षणिक सहलीच्या प्रवासाला सुरुवात केली.
जेजूरीच्या पुढे निसर्ग रम्य मोकळ्या जागेत सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी न्याहरीचा आनंद लुटला. त्यानंतर श्री बनेश्र्वर या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्यातील कुंडामध्ये मासे व कासव यांना प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद विद्यार्थी व शिक्षक यांनी लुटला.
यानंतर बनेश्र्वर उद्यान येथे श्री. सुनिल माळवे (लिपिक नसरापूर वनविभाग) व श्री.लक्ष्मण शिंदे (कवी) यांचे सहकार्य लाभले. त्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी दुपारच्या भोजनाचा स्वाद घेतला.
त्यानंतर प्रतिबालाजी केतकावळे या ठिकाणी श्री बालाजी यांचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. येताना सासवड- जेजूरी-मोरगाव मार्गे सहल बारामती या ठिकाणी सुखरूप पोहचली. या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष घटकांचा अनुभव विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल असे वाटते.
सहल यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड, खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे, सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.