शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात…

‘श्रद्धा’ या कल्पनेवर तर माध्यमिक विभागाचा ‘देशभक्ती’

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

‘श्रद्धा’ या कल्पनेवर तर माध्यमिक विभागाचा ‘देशभक्ती’

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन नुकतेच धुमधडाक्यात पार पडले. यामध्ये विदयार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व विविध मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले.

विद्यालयाचा क्रीडा महोत्सव दि. ११ ते १३ डिसेंबर २०२४ रोजी संपन्न झाला. याचे उदघाटन मा.श्री. महेश चावले, तालुका क्रीडा अधिकारी, बारामती व मा.श्री. सुलतान डांगे, महाराष्ट्र पोलीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मा.श्री. महेश चावले साहेब यांनी खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दि. २६ डिसेंबर रोजी विद्यालयाच्या वतीने सर्व विदयार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला व पालकांसाठी पालक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून मा.प्रा.श्री. विजयकुमार शिंदे (सर), विभाग प्रमुख मानसशास्त्र विभाग, टि.सी. कॉलेज, बारामती हे उपस्थित होते. त्यांनी पालक हे विदयार्थ्यांच्या जडण-घडणीत कशा प्रकारे महत्त्वाची भूमिका निभावतात याबद्दल मार्गदर्शन करून पालक स्पर्धाचे पारितोषिक वितरण केले.

दि. २७ डिसेंबर रोजी पालकांसाठी पौष्टिक पदार्थ बनवण्याच्या पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, आनंद मेळावा व पाककृती स्पर्धेचे उद्घाटन विदयालयाचे पालक मा.श्री. नवनाथ साळुंके (सी.ए.) यांच्या हस्ते झाले. त्यांनी या शाळेत विदयार्थी घातल्यानंतर आम्ही पण शाळेतच शिक्षण घेत असल्याचा अनुभव याप्रसंगी व्यक्त करून शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

दि.२९ डिसेंबर रोजी खेळिया the play Group, अंकुर बालभवन व प्राथमिक विभागाच्या विविध गुणदर्शन व पारितोषिक वितरण या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. महेश साहेबराव रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद बारामती हे उपस्थित होते त्यांनी बारामती नगरपरिषदेतर्फे आयोजित स्वच्छता उपक्र‌माची माहिती दिली व स्वच्छता उपक्रमात सहभाग घेण्याचे आवाहन केले. तसेच दि. ३० डिसेंबर रोजी गुरुकुल विभाग विविध गुणदर्शन व बक्षीस वितरण या कार्यक्रमासाठी मा.श्री. मिलिंद शिंत्रे (लेखक, दिग्दर्शक व अभिनेते) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी भारत मातेच्या प्रतिमापूजनची स्तुती करून भारतमातेबद्दल गोष्टी स्वरुपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.श्री. श्रीकृष्ण अभ्यंकर, मुख्य समन्वयक, पंचकोशाधारित गुरुकुल हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी वैयक्तिक सखोल असे बोलण्याचे आश्वासन दिले. प्राथमिक विभागाचा विविध गुणदर्शन कार्यक्रम ‘श्रद्धा’ या कल्पनेवर तर माध्यमिक विभागाचा ‘देशभक्ती’ या कल्पनेवर आधारित होता.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, उपाध्यक्ष मा. श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष मा. श्री. हृषिकेश घारे (सर), सचिव मा. श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे, व सर्व संचालक मंडळ तसेच गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, स्नेहसंमेलन प्रमुख राणीताई झगडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक – विद्यार्थी कुटुंब प्रमुखाप्रमाणे सामील होते.

तसेच हा सर्व वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, बारामती या ठिकाणी नियोजनबद्ध पार पडला. या कार्यक्रमाला विदयालयातील सर्व पालकांचे सहकार्य लाभले या सर्व स्पर्धांचे व कार्यक्रमाचे नियोजन आचार्य, मुख्याध्यापक व कृतीशील शिक्षक – शिक्षकेतर वर्ग यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!