जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी…

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी…
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाच्या वातावरणात प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
तसेच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी १२ जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विद्यालयातील खेळीया द प्ले ग्रुप (नर्सरी), छोटा व मोठा गट या वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित संस्थेच्या मान्यवरांनी सर्वांना राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती आणि आजपासून सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रीयेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष समन्वय मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष मा. श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष मा. श्री. हृषिकेश घारे (सर), गुरुकुलचे आचार्य मा.श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक मा.श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख मा.श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक – विद्यार्थी उपस्थित होते.